दिनांक-२४/०५/२०२३, पुणे
येरवडा पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं.194/2023,भा.दं.वि.कलम 506(2),504,506,427,143, 144,147,148,149,भारतीय हत्यार कायदा कलम 4(25),महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1) 135,क्रिमिनल लॉ अमेंडमेड कायदा कलम 3,7,महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 चे कलम 3(1)(त्त्),3(2),3(4) गुन्हयातील पाहिजे आरोपी याचा शोध घेत असताना, तपास पथकातील पोलीस अंमलदार, राहुल परदेशी व सुशांत भोसले यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्हयातील आरोपी हा चिमाघाट येरवडा भागात येणार आहे.
सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा पोलीस स्टेशन यांना कळविल्याने त्यांनी मिळालेल्या माहितीवरुन कारवाई करणेबाबत मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे सदर ठिकाणी जावून आरोपी यास पकडले. त्याचेकडे चौकशी करता त्याने दाखल गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. सदर आरोपीस दि.23/05/2023 रोजी अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि रविंद्रकुमार वारंगुळे करत आहेत.
तसेच विश्रांतवाडी, कोरेगाव पार्क, विमाननगर पोलीस स्टेशन कडील गुन्हयामध्ये फरार असल्याची कबुली दिल्याने तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, श्रीरंजनकुमार शर्मा, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-4, श्री.शशिकांत बोराटे, सहा.पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, श्री.किशोर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री.बाळकृष्ण कदम, पोलीस निरीक्षक, गुन्हे, श्री.जयदिप गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोउपनि. अंकुश डोंबाळे, सर्व्हेलन्स अधिकारी, रविंद्रकुमार वारंगुळे, सपोफौ.प्रदिप सुर्वे, पोलीस अंमलदार, गणपत थिकोळे, दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, अमजद शेख, सागर जगदाळे, कैलास डुकरे, प्रविण खाटमोडे, पोअं अनिल शिंदे, राहुल परदेशी, सुरज ओंबासे, दत्तात्रय शिंदे, सुशांत भोसले, प्रशांत कांबळे अश्विन देठे यांनी केलेली आहे.