दरोड्याच्या तयारीत असलेल्या आरोपींना अटक करण्यात सहकार्य करणाऱ्या ग्रामस्थांचा प्रशस्तीपत्र देवून गौरव

पालघर, दि. २५/०५/२०२३.
श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर यांनी सुरु केलेल्या जनसंवाद अभियान अंतर्गत प्रत्येक पोलीस ठाणे स्तरावर एक गाव – एक अंमलदार ही योजना राबविण्यात येत आहे. मनोर पोलीस ठाणे हद्दितील गोवाडे या गावाकरीता पोलीस अंमलदार पोना/1123 राजु सुक-या भोईर यांची नेमणुक केलेली आहे. दि.16/05/2023 रोजी पहाटे 03.00 वाजेच्या सुमारास एका सर्तक ग्रामस्थाने मनोर पोलीस ठाणे येथे फोन करून कळविले की, मौजे गोवाडे गावचे हद्दीमध्ये एका घराचे बाजुला असलेल्या पेट्रोल पंपा जवळील शेतामध्ये काही संशयीत इसम दबा धरून बसले आहेत. सदर माहितीवरून मनोर पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी पो.नि.श्री.उमेश पाटील, सपोनि.श्री.केशव राठोड हे पोलीस पथकासह तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. पोलीसांना पाहताच तेथे दबा धरून बसलेले संशयीत एकुण 06 इसम हे पोलिसांना पाहुन पळुन जात असताना पोलीसांनी व गोवाडे गावातील खालील नमूद ग्रामस्थांनी त्यांचा पाठलाग करून 04 आरोपीतांना पकडण्यात यश आले आहे. त्यांची कसुन चौकशी केली असता त्यांनी आपसात संगनमत करून सामाईक इरादयाने घातक शस्त्र स्वत:कडे बाळगुन पेट्रोल पंप अथवा मनोर – पालघर रोडने जाणा-या येणा-या वाहनांवर दरोडा घालण्यासाठी एकत्र जमुन दरोड्याचा गुन्हा करण्याचे तयारीत असताना मिळुन आले म्हणुन मनोर पोलीस ठाणे येथे भादविसं कलम 399 प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन गुन्हयात 04 आरोपींना अटक केली. तरी वरील गुन्ह्यात जनसंवाद अभियानात सहभागी असलेल्या 7 ग्रामस्थांच्या सहाय्याने आरोपींना अटक करण्यात यश आले.

तरी गोवाडे गावातील 7 सुजान ग्रामस्थांचा दि.24/05/2023 रोजी श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर यांचे हस्ते जनसंवाद अभियानामध्ये उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवून वरील गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यात सहकार्य करून होणारा गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडण्यास अटकाव केला त्यांच्या या प्रशंसनीय कामगीरीमुळे त्यांना प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देवून गौरव करण्यात आला.