पुणे शहर, दि. १८/०४/२०२३.
वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री.लकडे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री.काकडे, मुंढवा पो.स्टे.पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथक अधिकारी सपोनि संदीप जोरे व स्टाफ असे मुंढवा पोलीस स्टेशन,हद्दीमधील पेट्रोलिंग करत असताना आरोपी सुरज संजय सोनोने, वय 20 वर्षे, रा.यमुना बिल्डींग,गुरुकृपा सोसायटी,केशवनगर,मुंढवा,पुणे मुळ रा.मु.गायगाव, पो.चिंचोली कारफार्म,ता. शेगाव,जि.बुलढाणा व त्याचा अल्पवयीन साथीदार यांचेवर संशय आल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्याचे ताब्यात असलेली मो.सा. बाबत तपास केला असता, ती गुन्हा रजि नं 130/2023 भा.द.वी.क.379 मधील चोरी झालेली मोटर सायकल असल्याचे निष्पन्न झाले. सदर आरोपीकडे अधिक तपास केला असता तपासामध्ये सदर आरोपी व वि.सं.बालक यांनी मुंढवा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दोन मोटर सायकल, एक मोबाईल, चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये नदीपात्र रस्ता, नुरी मश्जिदचे गेट समोर, खराडी पुणे येथे कारची काच फोडून किंमती मोबईलची व हडपसर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक मोपेड वाहन चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर मोटर सायकल व किंमती मोबाईल आरोपीकडुन जप्त करण्यात आले असुन एकुण 05 गुन्हे उघडकीस आले आहेत.
सदरची कामगीरी अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग पुणे शहर,श्री.रंजनकुमार शर्मा,मा.पोलीस उप-आयुक्त,परिमंडळ 5 पुणे शहर,श्री विक्रांत देशमुख, सहा.पोलीस आयुक्त,हडपसर विभाग पुणे शहर.श्री.बजरंग देसाई, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक,मुंढवा पोलीस ठाणे पुणे,श्री.अजित लकडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे),श्री प्रदिप काकडे मुंढवा तपास पथकाचे अधिकारी सहा.पोलीस निरीक्षक संदिप जोरे, व तपास पथकातील अंमलदार यांनी केली आहे.
