कासीम उर्फ चित्ता बाबर बुरुज इराणी व त्याचे इतर 21 साथीदार यांचेवर MCOCA अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई

दिनांक-२४/०५/२०२३, पुणे

          दि.21/04/2023 रोजी रात्रौ 10/30 वा.फिर्यादी महिला यांचा भाऊ यास आरोपी व त्याचे इतर 21 साथीदार यांनी खाली पाडुन, जीवे मारण्याचा प्रयत्न करीत होते. त्यावेळी फिर्यादी हया सदरची झालेली भांडणे सोडविण्यासाठी मध्ये पडले असता त्यांनाही आरोपीत इसमांनी खाली पाडुन, त्यांचा विनयभंग केला होता. त्यातील महिला आरोपी हीने फिर्यादी यांचे तोडांवर काटा चमच्याने मारहाण करुन जखमी केले होते. तसेच फिर्यादी यांचे भाऊ व मामे भाऊ यांना जीवे ठार मारण्याचे उद्देशाने आरोपी यांनी त्याचे हातातील लोखंडी गज, हॉकी स्टीक, लोखंडी धारदार हत्याराने डोक्यात व डोळ्या जवळ मारहाण करुन गंभीर जखमी केले. त्यानंतर फिर्यादी यांना हॉकी स्टिकने मारून, दुखापत करुन आरोपीतांनी वस्ती मध्ये काचेच्या बाटल्या व दगडफेक करून,त्यांचे हाता मध्ये असलेल्या धारदार हत्यारे दाखवुन सदर परिसरात दहशत पसरविली. सदरबाबत खडकी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

   सदर गुन्ह्राच्या तपासात निष्पन्न झालेले नऊ आरोपी यांना अटक करण्यात आलेली असुन, टोळी प्रमुख याचेसह इतर आरोपीचा शोध सुरु आहे.

सदर आरोपी याने त्याचेसह अन्य सदस्यांसाठी आपले अधिपत्याखाली प्रत्येक गुन्हयात काही सामाईक व काही नवीन साथीदार यांना सोबत घेवुन, स्वत:ची संघटीत टोळी तयार करून, अवैद्य मार्गाने अर्थिक फायदा मिळविण्याचे उद्देशाने स्वत:चे गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व व दहशत प्रस्थापित ठेवण्यासाठी, संघटित गुन्हेगारी संघटनेचा प्रमुख म्हणुन किंवा संघटनेच्या वतीने एकट्याने किंवा संयुक्तपणे, हिंसाचाराचा वापर करुन अथवा हिंसाचाराची धमकी देवुन किंवा धाकदपटशहा दाखवुन, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत करणे, गुन्हा करण्यासाठी कट रचणे, नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान करुन, तोडफोड करणे, बेकायदेशिर अग्नीशस्त्र जवळ बाळगणे, पोलीसांच्या आदेशाचा भंग करणे,सर्वसामान्य नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करणे, बेकायदेशीर जमाव जमविणे अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे वारंवार केलेेले आहेत. त्यांचेवर प्रतिबंधात्मक कारवाई करून देखील सुध्दा त्यांनी पुन्हा पुन्हा गुन्हे केलेले आहेत.

यातील आरोपी यांनी संघटीतपणे दहशतीचे मार्गाने स्वत:चे बेकायदेशिरपणे आर्थिक फायदया करीता सदरचा गुन्हा केल्याचे दिसुन आल्याने, तसेच त्यांचे वर्तनात सुधारणा होत नसल्याने प्रस्तुत गुन्हयात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 प्रमाणेचा अंर्तभाव करणे कामी खडकी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विष्णु ताम्हाणे यांनी पोलीस उप-आयुक्त, परि-04, पुणे, श्री.शशिकांत बोराटे यांचे मार्फतीने अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, श्री.रंजनकुमार शर्मा यांना सादर केलेला होता.

     सदर प्रकरणाची छाननी करून खडकी पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं.123/2023 भादविक 307, 354,324,323,504,143,147,148,149,महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1)135,सह क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अँक्ट कलम 7 प्रमाणे दाखल असलेल्या गुन्हयात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 चे कलम 3(1)(त्त्),3(2),3(4)प्रमाणेचा अंर्तभाव करण्याची अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग,श्री.रंजनकुमार शर्मा यांनी मान्यता दिली आहे.

सदर गुन्हयाचा पुढील तपास श्रीमती.आरती बनसोडे, सहा.पोलीस आयुक्त,खडकी विभाग,पुणे शहर हे करीत आहेत.

     सदरची उल्लेखनिय कामगिरी पोलीस आयुक्त पुणे शहर, श्री.रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त, श्री.संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, श्री.रंजनकुमार शर्मा, पोलीस उप-आयुक्त, परि-04,पुणे, श्री.शशिकांत बोराटे, सहा.पोलीस आयुक्त, खडकी विभाग, पुणे शहर, श्रीमती.आरती बनसोडे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विष्णु ताम्हाणे, पोलीस निरीक्षक, (गुन्हे), श्री.मानसिंग पाटील, निगराणी पथकाचे पोलीस उप-निरीक्षक,वैभव मगदुम व पोलीस अंमलदार यांनी केला आहे.

पोलीस आयुक्त,पुणे शहर, श्री.रितेश कुमार यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन शरिराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून, गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्या बाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मकोका अंतर्गत केलेली ही 25 वी कारवाई आहे.