जिवानीशी ठार करणाऱ्या आरोपीला कोर्टातुन शिक्षा

नागपूर ग्रामीण, दि. २५/०५/२०२३.
पो.स्टे. अरोली :- फिर्यादी, वय 38 वर्ष, रा. रेवराल ता. मौदा यांच्या रिपोर्ट वरुन पो.स्टे. अरोली येथे अप. क्र. 62/2020 कलम 302 भादवि. कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला होता.
यातील मृतक नामे- दिगांबर जागोबाजी घुले, वय 52 वर्ष रा. रेवराल ता. मौदा व आरोपी नामे- मुरलीधर कानुजी ढोमणे, वय 40 वर्ष, रा. रेवराल ता. मौदा यांचे घर एकमेकाला लागुन असुन नमुद घटना ता. वेळी व ठिकाणी मृतक व आरोपी यांच्यात घरासमोरील अंगणाच्या जागेवरुन वादविवाद होवुन यातील आरोपीने मृतक यास लाकडी दांडयाने मृतकाच्या डोक्यावर, छातीवर मारुन गंभीर जखमी केले. उपचारादरम्यान मृतक हा मरण पावला.
सदर प्रकरणाचे तपास सहायक पोलीस निरीक्षक विवेक सोनवाने यांनी करून सदर प्रकरण न्याय प्रविष्ठाकरीता मा. कोर्टामध्ये सादर केले. आज दिनांक 24/05/2023 रोजी मा. कोर्ट विद्यमान न्यायाधीश डी. जे. देशमुख सा. यांनी वरील नमुद आरोपीस कलम 302 भादवि. मध्ये आजिवन कारावास व 5000/- रु. दंड. दंड न भरल्यास 01 महीना साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे. कोर्ट कामात पैरवी अधिकारी म्हणुन पोशि/1202 उमेश पाल पो. स्टे अरोली यांनी मदत केली आहे.