लोहमार्ग मुंबई, दि. २५/०५/२०२३.
पनवेल रेल्वे पोलीस ठाणे (मालमत्ता परत केले बाबत).
दिनांक 24/05/2023 रोजी खारघर रेल्वे स्टेशन येथे दिवसपाळी ड्युटीस आम्ही WHC 3003, PC 904 नरळे व 2 महिला होमगार्ड यांच्या सोबत ड्युटीवर असताना सुमारे 11.10 वा. एक महिला प्रवासी नामे चेतना जितेंद्र कोठारे वय 27 राह. कादीवली ह्या खारघर रेल्वे स्टेशन येथे फोन वर बोलत उतरुन गेल्या उतरल्यावर त्यांचे लक्षात आले की त्याचा लाल रंगाची लॅपटॉप बॅग त्यात MSI कंपनीचा काळे रंगाचा किंमत 50,000/- किमतीचा लॅपटॉप गाडीत रॅक वर विसरला आहे ते घाबरत परत पोलिसांकडे आले व त्यांनी सांगितलेल्या हकिगत वरुन पोलिसांनी तात्काळ खादेश्वर रेल्वे स्टेशन येथे फोन करून कळविले असता म.होम.1176 चव्हाण व हिने गाडी अटेन्ड केली असता वरील वर्णनाची बॅग व लॅपटॉप मिळून आली. खारघर रेल्वे स्टेशन येथे प्रवाशी ह्याना त्याची वरील वर्णनाची बॅग ताब्यात दिली.

वडाळा रेल्वे पोलीस ठाणे (मालमत्ता परत केल्याबबत.)
दिं 24/05/2023 रोजी सकाळी 09:00. ते रात्री 21:00 वाजेपर्यंत दिवस पाळी ड्युटी करता ASI बागवे, PN 2714 पवार, WHC 2529 सुर्वे, WPN 3162 दडस, माहीम रेल्वे स्टेशन ड्युटीस असताना सुमारे 09.50 वा. अप चर्चगेट स्लो लोकलचे चर्चगेट बाजूकडील पहिल्या लेडीज डब्यातील फिर्यादी नामे कृपाली महेंद्र पटेल वय 24 वर्ष ह्या आय phone 10 S, व्हाईट कलर किंमत 80,000/- घेऊन प्लॅटफॉर्म आऊट साईडला दरवाज्यात उभ्या राहून सांताक्रुज ते चर्चगेट प्रवासादरम्यान लोकल माहीम रेल्वे स्टेशन येथे चालू लोकल मधून मोबाईल हातातून सुटून ट्रॅक वर पडला सदर बाबत फिर्यादी यांनी सांगितल्यानंतर वरील सर्व स्टाफ सह माहीम रेल्वे स्टेशन ट्रॅक वर शोध घेऊन सुद्धा मोबाईल न सापडल्याने परंतु मोबाईलची रिंग चालू असल्याने DB पथक 2 व PSI डोके यांना फोन द्वारे लोकेशन बाबत विचारणा केली असताना व हरवलेल्या मोबाईलवर रिंग करीत असता फोन उचलणाऱ्या व्यक्ती नामे उलाउद्दीन राशिद खान याने त्यास मोबाईल मिळाला असून शिवडी येथे भाजी विक्रीचा धंदा करत असल्याबाबत सांगितल्याने WHC 2529 सुर्वे WPN 3162 दडस यांनी पाठपुरावा करून शिवडी येथे जाऊन सदर इसमा कडून मोबाईल हस्तगत करून फिर्यादी यांना खात्री करून ताब्यात दिला