विनयभंग करणाऱ्या आरोपीतांना कोर्टातुन शिक्षा

नागपूर ग्रामीण, दि. २५/०५/२०२३.
पो.स्टे. कन्हान :- फिर्यादी यांच्या रिपोर्ट वरुन पो.स्टे. कन्हान येथे अप. क्र. 235/2018 कलम 354 (अ. ड), 34 भादवि सहकलम 11(1), 12 पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंद झाला होता.
यातील पिडीता फिर्यादी ही सिलाई मशीनचे काम शिकुन कन्हान वरुन आपले घरी परत येत असता यातील आरोपी नामे- 1) मोनु उर्फ नौशाद ईदरीस शेख वय 20 वर्ष रा. कांद्री 2) साहील चंद्रभान चौधरी वय 21 वर्ष रा. पिपरी कन्हान 3) दयाशंकर नेमलाल पासी, वय 21 वर्ष रा. पिपरी कन्हान यांनी पिडीतेला थांबवुन तिचे नाव गाव मोबाईल क्रमांक विचारला तेव्हा पिडीतेने नकार दिला असता आरोपीतांनी संगणमत करुन पीडितेची छेड काढली.
सदर प्रकरणाचे तपास पोलीस उपनिरीक्षक राजु हाके यांनी करून सदर प्रकरण न्याय प्रविष्ठाकरीता मा. कोर्टामध्ये सादर केले. आज दिनांक 24/05/2023 रोजी मा. कोर्ट विद्यमान न्यायाधीश ए. डी. जे. पांडे सा. यांनी वरील नमुद आरोपी क्र. 1 यास कलम 12 पोक्सो मध्ये 1 वर्ष सश्रम कारावास व 2000/- रु. दंड. दंड न भरल्यास 2 महीने सश्रम कारावास. तसेच 354(ड) भादवि मध्ये 1 वर्ष सश्रम कारावास व 2000/- रु. दंड. दंड न भरल्यास 2 महीने सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे तसेच ईतर दोन आरोपी यास निर्दोष रीहा करण्यात आले. कोर्ट कामात पैरवी अधिकारी म्हणुन पोशि/1468 सैफुल्लाह अहमद पो. स्टे कन्हान यांनी मदत केली आहे.