पोलीस अधीक्षक कार्यालयात पार पडला महाराष्ट्र दिन.

गडचिरोली, दि. ०३/०५/२०२३.
पोलीस अधीक्षक यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
दिनांक 01 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मीती झाली, तेव्हापासून 01 मे हा दिवस संपूर्ण महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र दिन व कामगार दिन म्हणुन साजरा करण्यात येतो. आज पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथे पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांचे हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम ठिक 6.45 वा. पार पडला.
यावेळी सर्वप्रथम पोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रांगणात शहीद स्मारकास पुष्पचक्र अर्पण करुन सर्व शहीद बांधवांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर दिनांक 01 मे 2019 रोजी मौजा जांभुळखेडा ते कुरखेडा मार्गावर नक्षलवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्यात शहीद वीर जवानांना आदरांजली वाहिली. त्यानंतर महाराष्ट्र दिनाच्या पुर्वसंधेला पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह जाहीर झालेल्या एकुण 158 पोलीस अधिकारी/अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक यांनी प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला. तसेच उपस्थित सर्व पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, मंत्रालयीन स्टाफ व शहीद कुटुंबीय यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यासोबतच सर्व उपस्थित शहीद कुटुंबीयांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.
यावेळी कार्यक्रमात पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. अनुज तारे , अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी श्री. यतिश देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली श्री. प्रणिल गिल्डा हे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जनसंपर्क कार्यालयाचे प्रभारी अधिकारी व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.