मुंबई शहर, दि. १८/०४/२०२३.
फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून आर.सी.एफ. पोलीस ठाणे कलम 387,386,323, 504, 506(2),427 भा.द.वि. सह कलम 37(1)(अ),135,142 मपोका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर गुन्हयाच्या तपासात असे निश्पन झाले की, नमुद गुन्हयातील आरोपीत इसम नामे अरूणाचलम गणेश मुर्ती नायडू उर्फ अरूण मुर्ती नायडू, वय 25 वर्षे, हा आर.सी.एफ. पोलीस ठाणे हद्दीत व लगतच्या परिसरात दहशत निर्माण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे व धमक्या देणे, घातक हत्यार जवळ बाळगून इच्छापुर्वक जबर दुखापत पोहचवणे, जबरी चोरी करणे, हद्दपार आदेषाचे उल्लंघन करणे, फौजदारीपात्र धाकदपटशा करणे, अंमली पदार्थ जवळ बाळगणे, लोकसेवकाला त्याचे कर्तव्यापासून धाकाने परावृत्त करणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून त्याची दहषत पसरवून सार्वजनिक शांतता व सुरक्षितेतसाठी धोकादायक व्यक्ती झाला असुन त्याचे विरूध्द आर सी एफ पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे नोंद आहेत.
नुमद इसमाविरूध्द सन 2017 पासुन गुन्हे नोंद असुन त्याच्याविरूध्द यापुर्वी फौजदारी दंड प्रकीया संहिता व महाराश्ट्र पोलीस कायदा अन्वये वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करून देखील त्याच्या वर्तणुकीत सुधारणा झाली नसल्याचे निदर्षनास आल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आर सी एफ पोलीस ठाणे यांनी इसम नामे अरूणाचलम गणेश मुर्ती नायडू उर्फ अरूण मुर्ती नायडू याचे विरूध्द दाखल गुन्हयाचे अनुशंगाने एम.पी.डी.ए.कायदा 1981 अन्वये स्थानबध्द कार्यवाहीसाठी पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-6, मुंबई यांचे मार्फतीने पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांचेकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांनी अरूणाचलम गणेश मुर्ती नायडू उर्फ अरूण मुर्ती नायडू यास स्थानबध्द करण्याचे आदेश पारीत केल्याने, त्यास तात्काळ ठाणे मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द करण्यात आले.
या वर्षी जानेवारी 2023 पासून परिमंडळ 6 अंतर्गत ”महाराश्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औशधी द्रव्यविशयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ति, दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्षन करणारे व्यक्ती (व्हिडीओ पायरेटस), वाळु तस्कर व अत्यावष्यक वस्तुंचा काळा बाजार करणारे व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम “ 1981 अन्वये केलेली ही दुसरी कारवाई असून वपोनि बाळासाहेब घावटे, सपोनि रविंद्र पाटील, सफौ गुलाब चौधरी, पोशी सचिन वाघमारे, मपोशी मिनल पाटील या पथकाने डिसेंबर 2021 ते एप्रिल 2023 पर्यंत आर सी एफ पोलीस ठाणे हद्दीतील 05 धोकादायक इसमांविरूध्द एमपीडीए कायदयाअंतर्गत स्थानबध्द करण्यात आले आहे. सार्वजनिक सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारे व वारंवार गुन्हे करून सार्वजनिक सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या गुन्हेगारांची गय केली जाणार नसुन त्यांच्या विरुद्ध भविश्यात देखील अशा प्रकारची कडक कारवाई करण्यात येईल.
