ई रिक्षा व बॅटरी चोरांना अटक

दिनांक- १९/०४/२०२३, नागपूर

दिनांक. ३०/०३/२०२३ चे २१:०० ते  दि. ३१/०३/२०२३ चे ०८:०० वा. चे दरम्यान पोलीस ठाणे यशोधरानगर हद्दीत एनआयटी मैदान, जामदार वाडी, पाण्याचे टाकी जवळ राहणारे फिर्यादी यांनी त्यांची ई रिक्षा चार्जिगकरीता लावुन ठेवली असता अज्ञात चोरट्याने रिक्षा मधिल दोन बॅटरी चोरून नेल्याने फिर्यादीचे तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला.

यशोधरानगर पोलीसांनी मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून सापळा रचुन विटाभट्टी चौक येथे दोन आरोपी यांना ताब्यात घेवुन सखोल विचारपुस केली असता आरोपींनी त्यांचे साथिदार यांचे सह वरील गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच आरोपींनी पो.ठाणे हद्दीतील दोन साथिदार यांचे सह चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपींना अटक करून त्यांचे ताब्यातुन ई रिक्षाच्या बॅटरी एकुण १२ नग व जुने वापरते दोन ई रिक्षा असा एकुण १,८४,०००/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींकडुन चोरीचे एकुण ४ गुन्हे उघडकीस आण्यात आले.

                वरील कामगिरी श्री. श्रवण दत्त पोउपआ परि क्र. ५ नागपूर शहर श्री. संतोष खांडेकर सपोआ जरीपटका विभाग वपोनि श्री. विश्वनाथ चव्हाण क्राईम पोनि प्रशांत जुमडेे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि सुरेश कन्नाके, पोहवा. अजय कुटे, पोनाअ. आफताब शेख, पोअ. मनिश  झरकर, रोहीत रामटेके व दुर्गेश शुक्ला यांनी केली.