नागपूर शहर, दि. २६/०५/२०२३.
दिनांक 13.05.2023 ते दि. 22.05.2023 चे 23.59 वा. चे दरम्यान पोलीस ठाणे अजनी हद्दीत वसंत नगर, जुना बाबुलखेडा, नागपूर येथे राहणाऱ्या फिर्यादी वय 25 वर्ष, ह्या नोकरीच्या शोधात असल्याने त्यांनी शाईन डॉट कॉम वर रिज्युम अपलोड केला. फिर्यादी घरी हजर असता त्यांना मोबाईल क्र. 9958744531 चा धारक आरोपिने फोन करून दुबई चे कंपनीमध्ये अकाऊंट पे बल या पदासाठी जागा असुन फिर्यादीस फोटो व पॅनकार्ड मागीतले. तसेच फिर्यादीचे आयडी वर मेल पाठवुन लिंक पाठविली. फिर्यादीने लिंक क्लीक करून 20 मार्काची ऑनलाईन परीक्षा दिली. तसेच प्रोफाईल व्हेरीफीकेशन साठी 1500/रू. आपले बॅंक खात्यावरून ट्रान्सफर केले असता, वेगवेगळ्या तारेखेला फिर्यादीचे अकाऊंट मधुन एकुण 5,17,000/-रू. ऑनलाईन ट्रान्सफर करून आरोपीने फिर्यादीचा विश्वासघात करून आर्थीक फसवणुक केली.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरून पोलीस ठाणे सायबर येथे आरोपीविरूद्ध कलम 419, 420, भा.दं.वि. सहकलम 66(सि), 66(डी) माहीती तंत्रज्ञान कायदा अन्वये गुन्हा नांदवुन आरोपीचा शोध घेत आहे. पुढील तपास सपोनि भिसे सायबर पोलीस ठाणे हे करीत आहे
