घरफोडी करणाऱ्या आरोपी विरूध्द गुन्हा दाखल

नागपूर ग्रामीण, दि. १०/०४/२०२३.
दिनांक 08.04.2023 चे 23ः30 वा. ते दि. 09.04.2023 चे 03.20 वा. चे दरम्यान पोलीस ठाणे गणेशपेठ हद्दीत घर नं. 908/ए, बजेरिया चाळ, संत्रा मार्केट, भगत यांचे घरी किरायाने राहणारे फिर्यादी वय 32 वर्ष, हे आपले घराला कुलुप लावुन (लोको पायलट) डयुटीवर गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरटयाने त्यांचे घराचे आजुबाजुचे घराचे दारांना बाहेरून कडी लावुन फिर्यादीचे घराचे दाराचे कुलुप तोडुन घरात प्रवेश केला व बॅग मधील सोन्याचेे दागीने व रोख 20,000/रू असा एकुण 1,48,000/रू चा मुद्देमाल चोरून नेला.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पो.ठाणे. गणेशपेठ येथे पोउपनि राउत \यांनी अज्ञात आरोपी विरूध्द कलम 457, 380, भादवि अन्वये गुन्हा नोंदवुन आरोपीचा शोध घेत आहे.