खंडणी मागणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल.

नागपूर शहर, दि. ०२/०५/२०२३.
फिर्यादी हे पो.ठाणे लकडगंज हद्दीत एच.पी.सी.एल पेट्रोल पंप भंडारा रोड, लकडगंज येथे मॅनेजर असुन, पेट्रोल पंपावर हजर होते. घटने वेळेपुर्वी आरोपी हा त्याचे एका साथीदारा सोबत काळया रंगाच्या विना नंबरच्या ऍक्टिव्हा गाडीवर आला व 200/- रू चे पेट्रोल भरले. मशीन वरील चालकाने त्यास पैसे मांगीतले असता आरोपीने आरडाओरड करून ”तु मुझे पहचानता नही क्या, मुझे पेट्रोल के पैसे मांगना नही, यह पेट्रोल पंप चलाना है, तो मुझे पेट्रोल के पैसे मांगना नही“ असे म्हणुन शिवीगाळी करीत होता. फिर्यादी हे संमजावीत असतांना आरोपीने फिर्यादीस ”तुम लोग सबेरे का सुरज देख नही पाओगे, मै लडके लेके आता हु“ असे म्हणुन पैसे न देता निघुन गेला. आरोपी याने यापुर्वी सुध्दा असेच कृत्य केले असल्याने फिर्यादीने दुर्लक्ष केले. आरोपी याने थोडया वेळाने पुन्हा त्याच साथिदारासह येवुन शिवीगाळी केली. फिर्यादी हे त्यास समजावित असता आरोपीने त्याचे जवळील स्टीलचे शस्त्र काढुन फिर्यादीस हातबुक्कीने मारहाण करीत असतांना फिर्यादीचे पंपावरील कर्मचारी याने पोलीसांना फोन करून फिर्यादीचे बचावास धावले असता आरोपी व साथिदार पळुन जातांना आरोपी सन्नी हा धावतांना रोडवर पडल्याने त्याचे हाता पायाला मार लागला व जख्मी झाला. जख्मी आरोपी यास उपचारासाठी मेयो हॉस्पीटल येथे दाखल केले आहे. उपचार सुरू आहे.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पो.ठाणे लकडगंज येथे पोउपनि केवटी यांनी आरोपी विरूध्द गुन्हा नोंदविला असुन पुढील तपास करीत आहे.