दरोडयाचे तयारीतील आरोपींना अटक.

नागपूर शहर, दि. २१/०४/२०२३.
धंतोली पोलीसांनी पेट्रोलींग दरम्यान मिळालेले खात्रीशीर माहीती वरून सावरकरनगर गार्डन जवळ धंतोली येथे सापळा रचुन व घेराव टाकुन तेथे दरोडयाचे तयारीत अंधारात बसलेल्या 5 ते 6 ईसमावर छापा टाकला असता चाहुल लागल्याने दोन ईसम अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेले. आरोपी जवळुन व घटनास्थळावर 1 हत्तीमार चाकु, लोखंडी स्क्रु ड्रायव्हर, मिरची पावडर, ईत्यादी साहीत्य मिळुन आले. आरोपींना नाव विचारले असता 1) वैभव ताराचंद शेंडे वय 21 वर्ष 2) राज राजेश बावणे वय 28 वर्ष दोन्ही राहणार राहुल नगर, धंतोली 3) प्रज्वल मुनीम टेंभुर्णे वय 25 वर्ष रा. आझाद चौक, जुनी अजनी, धंतोली, असे सांगीतले. आरोपी हे घटनास्थळी दरोडयाचे तयारीत साहीत्यासह मिळुन आल्याने त्यांचेविरूध्द पोलीस ठाणे धंतोली येथे पोउपनि शेख यांनी कलम 399 भा.दं वि. सहकलम 4,25 भा.ह.का. सहकलम 135 म.पो.का. अन्वये गुन्हा नोंदवुन 3 आरोपी यांना अटक केली आहे. पळुन गेलेल्या आरोपीचा शोध घेत आहे. पुढील तपास सुरू आहे.