फसवणुक करणारे आरोपींविरूध्द गुन्हा दाखल.

नागपूर शहर, दि.२६/०४/२०२३.
पोलीस ठाणे वाठोडा हद्दीत फिर्यादी यांचे घरी किरायाने राहायला आलेले आरोपी जोडपे यांनी वस्तीतील लोकांशी चांगले संबंध स्थापीत करून फिर्यादी व लोकांना अर्ध्या किमतीत ईलेक्ट्रीक सामान तसेच किराणा सामान मिळवुन देतो असे आमिश दाखवुन लोकांचा विश्वास संपादन केला. आरोपींनी फिर्यादीसह तिन लोकांकडुन एकुण 1,38,210/- रू घेतले व कोणतेही सामान न देता किंवा पैसे परत न देता घर सोडुन पळुन जावुन फिर्यादी व ईतर लोकांचा विश्वासघात करून फसवणुक केली. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे वाठोडा येथे आरोपींविरूध्द पोउपनि लेपांडे यांनी गुन्हा नोंदवुन आरोपींचा शोध घेत आहे.